Auto Rickshaw with a washbasin sanitiser wi fi Dustbin (PC - Twitter)

सध्या सोशल मीडियावर मुंबईतील ऑटो रिक्षाचा (Auto Rickshaw) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या रिक्षामध्ये हॅण्ड सॅनिटायझर, Wifi सेवा, बेसिन, पाणी, कचराकुंडी सारख्या सुविधा आहेत. हा रिक्षा पाहून महिंद्रा ग्रूपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या रिक्षाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिला अनेकांनी लाईक तसेच कमेंन्ट्स केल्या आहेत.

मुंबईमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातचं हा विविध सेवा असणाऱ्या या अनोखा रिक्षाचे नेटीझन्सनी कौतुक केलं आहे. या रिक्षात ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर, Wifi सेवा, बेसिन, पाणी, कचराकुंडी सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना या रिक्षातून प्रवास करतादेखील सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. (हेही वाचा - कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये सारं काही बंद असल्याने वैतागलेल्या 4 वर्षांच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव (Watch Video))

आनंद महिंद्रा यांनी या अनोख्या रिक्षाचा व्हिडिओ ट्विट करताना म्हटलं आहे की, 'कोरोनाच्या काळात या रिक्षा चालकाने स्वच्छ भारत अभियानाची जाहिरात केली आहे.' आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ अनेक युजर्संनी रिट्विट केला आहे. सध्या सोशल मीडियावर या अनोख्या आणि कोरोना काळात आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांनी युक्त अशा रिक्षाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.