Marriage Hall On Wheels (PC - Twitter)

Marriage Hall On Wheels: महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर सक्रिय असतात. दरम्यान, त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ एका पोर्टेबल मॅरेज हॉलचा आहे. या व्हिडिओमध्ये एक कंटेनर दिसत आहे. या कंटेनरमध्ये मंगलकार्यालय तयार करण्यात आलं आहे. हे मंगलकार्यालय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जाऊ शकते.

महिंद्रा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. नवीन सर्जनशीलता पाहून आनंद महिंद्रा खूप प्रभावित झाले. या व्हिडिओमध्ये पोर्टेबल मॅरेज हॉलची संकल्पना 2 मिनिटांच्या क्लिपमध्ये दाखवली आहे. हा हॉल पूर्णपणे घरासारखा म्हणजेच हॉटेलसारखा दिसत आहे. (हेही वाचा -Wedding Viral Video: आगोद 'आधार' कार्ड दाखवा, मगच लग्न मंडपात प्रवेश करा; वऱ्हाडींची पंचायत, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात 200 लोक बसू शकतात. 200 लोकांची क्षमता असलेला हॉल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येतो. ही कल्पना पाहिल्यानंतर सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. हे मंगलकार्यालय बनवणाऱ्यांचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मला या उत्पादनाची संकल्पना आणि डिझाइन करणाऱ्या व्यक्तीला भेटायला आवडेल. यात खूप सर्जनशीलता आणि विचारशीलता आहे. हे मंगलकार्यालय केवळ दुर्गम भागांपूरतेचं नव्हे तर पर्यावरणपूरक देखील आहे.

हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. इंटरनेट वापरकर्ते या संकल्पनेचे खूप कौतुक करत आहेत. तसेच या सर्जनशीलतेचे खूप कौतुक होत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, इनोव्हेशनला सीमा नसते. दुसर्या वापरकर्त्याने लिहिलं आहे की, व्वा! काय कल्पना आहे सर. अशा कल्पना खरोखर महान आहेत. हे केवळ सुंदरच नाही तर किफायतशीर देखील आहे. दरम्यान, या मंगलकार्यालयाची रचना लोकांना खूप आकर्षित करत आहे.