Viral Video: पश्चिम बंगालमधून (West Bengal) पुन्हा एकदा मानवतेला लाजवेल असे चित्र समोर आले आहे. येथे जलपाईगुडीमध्ये 70 वर्षीय पती आपल्या मुलासह आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. रुग्णवाहिका (West Bengal) चालकांनी त्यांच्याकडे 3000 रुपयांची मागणी केली होती. मात्र, तेवढे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. यानंतर वृद्ध बापाने आपल्या मुलासह पत्नीचा मृतदेह चादरीत गुंडाळला आणि खांद्यावर घेऊन शासकीय रुग्णालयापासून 40 किमी अंतरावर असलेल्या आपल्या घरी नेला.
पिता-पुत्र आईचा मृतदेह घेऊन जात असतानाच रस्त्यावरून जाणाऱ्यांनी त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले, मात्र त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अखेर एक NGO त्यांच्या मदतीला धावून आली. (हेही वाचा - Pune Ambulance Rate Card: रुग्णवाहिकांचा काळाबाजार रोखण्यासाठी Pune RTO कडून दर निश्चिती)
रुग्णालयापासून 50 किमी अंतरावर असलेल्या क्रांती येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यासाठी रुग्णवाहिकेने त्यांना 3 हजार रुपये मागितल्याचा दावा पिता-पुत्राने केला. जॉय कृष्ण दिवाण आणि त्यांचा मुलगा राम प्रसाद दिवाण यांनी ते गरीब असल्याचे सांगितले. त्यांनी रुग्णवाहिका चालकाला 1,200 रुपये देऊ शकतील, असं सांगितलं. परंतु चालकांनी त्यांना मदत करण्यास नकार दिला.
The Son of Bengal is carrying the dead body of Bengal's health system!
Which Bengal is this ?@narendramodi @AmitShah @amitmalviya @sunilbansalbjp @mangalpandeybjp @RajuBistaBJP @SuvenduWB @SwarnaliM @Priyankabjym @Amrita_06_11 @BJP4Bengal @Amitava_BJP @ pic.twitter.com/Vafb5hGFfp
— Dr. Shankar Ghosh (@ShankarGhoshBJP) January 5, 2023
पीडित राम प्रसाद दिवाण यांनी सांगितले की, त्यांच्या 72 वर्षीय आईला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांनी आईला जलपाईगुडी येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याच्या आईचा मृत्यू झाला. यानंतर पीडित दिवाण म्हणाले, “ज्या रुग्णवाहिकेने माझ्या आईला घरून रुग्णालयात आणण्यासाठी 900 रुपये घेतले, तीच रुग्णवाहिका माझ्या आईचा मृतदेह घरी नेण्यासाठी 3000 रुपये मागत होती. जे आम्ही देऊ शकलो नाही. त्यामुळे आम्ही आईचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून खांद्यावर टाकला आणि घराच्या दिशेने चालू लागलो."