Viral Video: मुंबईच्या वडाळा स्टेशनवर सतर्क रेल्वे अधिकाऱ्याने वाचवला वृद्ध महिलेचा जीव, Watch
Railway official saved the life of Women (PC - Twitter)

Viral Video: मुंबईच्या वडाळा स्टेशनवरील तिकीट कलेक्टरने (Ticket Collector) आपल्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेने विचार केल्यामुळे एका ज्येष्ठ महिलेचा जीव वाचला. मंगळवारी सकाळी मध्य रेल्वेने शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून येते की, सतर्क रेल्वे अधिकारी एका ज्येष्ठ महिला नागरिकाच्या मदतीसाठी धावून आले. जी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मदरम्यान पडली. रेल्वे स्थानकावरील इतर लोकांनीही महिलेला मदत केली.

ज्येष्ठ महिलेचे प्राण वाचवणाऱ्या तिकीट कलेक्टरचे (टीसी) मध्य रेल्वेचे सुधीर कुमार मांझी असे नाव आहे. साधना पठाणे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, वृद्ध महिलेच्या मुलीने सतर्क रेल्वे अधिकाऱ्याचे दयाळूपणाबद्दल आभार मानले. (हेही वाचा - Woman Beating Man Video: महिलेने पुरुषाला बसमध्ये बदडले, बसमध्ये छेडछाड केल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल)

या व्हिडिओमध्ये लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची नेहमीची गर्दी दिसत आहे. मात्र, ट्रेन धावायला लागल्यावर एक वृद्ध महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील अंतराच्या अगदी जवळ पडली. यावेळी तिकीट कलेक्टर महिलेच्या मदतीला धावून आला.

तिकीट कलेक्टर ताबडतोब वृद्ध महिलेकडे पोहोचला आणि तोपर्यंत महिलेच्या शेजारी उभ्या असलेल्या लोकांनाही घडलेला प्रकार लक्षात आला. धावत्या ट्रेनमधून महिलेला पडणार इतक्यात तिला वाचवण्यात आलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जीव वाचवल्याबद्दल महिला आणि तिच्या मुलीने सतर्क रेल्वे अधिकाऱ्याचे आभार मानले.