Mantralaya Power Outrage: मंत्रालयात 'बत्ती गुल'; नेटकर्‍यांकडून मजेशीर ट्वीट्स
Mantralaya Mumbai | (Photo credit: archived, edited, representative image)

दक्षिण मुंबई मध्ये असलेल्या मंत्रालयात आज (19 मार्च) अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने कामाचा खोळंबा झाला. दरम्यान Brihanmumbai Electric Supply and Transport अर्थात बेस्ट कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नरिमन पॉईंट रिसिव्हिंग पॉईंट मध्ये हाय व्होल्टेजमुळे हा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मंत्रालयाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी काही इंजिनिअर्स पाठवण्यात आले  आणि वीजपुरवठा 7 मिनिटांत पूर्ववत करण्यात आला आहे असे बेस्टच्या पीआरओ कडून सांगण्यात आले आहे. पण आज अचानक आणि कामाच्या दिवशी मंत्रालयाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने नेटकर्‍यांनी देखील या गोष्टीवर संधी साधत काही मजेशीर ट्वीट्स केली आहेत.

लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना वाढीव वीज बिलं दिल्यानंतर ती लवकरात लवकर भरा अन्यथा वीज कापली जाईल असा सरकारने इशारा दिला होता. या कारवाईवरून सरकारवर टीका देखील झाली आहे. मात्र मध्यंतरी अधिवेशनाच्या काळात वीज कापणार नाही असे काही दिवस सांगत पुन्हा त्यावरून यु टर्न घेत सरकारने महावितरणाला होत असलेला तोटा पाहता बिल भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा असे सांगण्यात आले आहे.

मंत्रालयाच्या 'बत्ती गुल' नंतरची काही मजेशीर ट्वीट्स

दरम्यान 12 ऑक्टोबर 2020 ला मुंबई मध्ये अचानक सर्वत्र वीज गूल झाली होती. त्यावेळी मुंबईलोकल सह अनेक महत्त्वाचे व्यवहार अचानक ठप्प झाले होते. यामागे सायबर हल्ला असल्याचं कारण देत त्यावर तपास सुरू आहे.