Viral Video (PC- Twitter)

Viral Video: महाविद्यालयात (College) एका विद्यार्थ्याला (Student) त्याच्या वरिष्ठांनी (Seniors) बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील कांदिवली भागातील एका कॉलेजबाहेरचा आहे. मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थ्याने सांगितले की, त्याला कॉलेजमध्ये अनेकदा त्रास दिला जायचा. लांब केसांमुळे त्याची चेष्टा केली जायची.

दरम्यान, विद्यार्थ्यांचा एक गट अचानक एका व्यक्तीला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एकटा तरुण प्रत्युत्तरात लढण्याचा प्रयत्न करत असला तरी एकामागून एक, अनेक पुरुष त्याला मारहाण करत आहेत. (वाचा - Aurangabad: पेट्रोल-डिझेल परवडत नाही, औरंगाबदचा तरुण कामावर जाण्यासाठी वापरतो घोडा; व्हिडिओ व्हायरल)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 10 ते 12 मुले एकत्र येऊन एका विद्यार्थ्याला मारहाण करताना दिसत आहेत. ही घटना 10 मार्चची आहे. या घटनेनंतर कांदिवली पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी एफआयआर नोंदवून दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.