Mumbai Youth Performs Risky Stunt On BEST Bus: मुंबईतील तरुणाचा वांद्र्यात बेस्ट बसमध्ये धोकादायक स्टंट, बसमागील कड्यावर उभा राहून केला प्रवास, पहा व्हिडिओ
Mumbai Youth Performs Risky Stunt On BEST Bus (PC - Twitter/ @bandrabuzz)

Mumbai Youth Performs Risky Stunt On BEST Bus: मुंबईतील वांद्रे (Bandra) परिसरातील एका तरुणाने गर्दीतून प्रवास करणं टाळण्यासाठी बेस्ट बसच्या (BEST Bus) मागील बाजूस असलेल्या छोट्या कड्यावरून धोकादायक प्रवास केला. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. ही घटना शहरातील कार्टर रोडवरील असल्याचं सांगण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतुकीवर केलेल्या धोकादायक स्टंटमध्ये एक व्यक्ती मागे नंबर प्लेटच्या शेजारी उभा असलेला दिसत आहे.

वांद्रे येथील कार्टर रोड ते पीस हेवन बसस्थानकादरम्यान हा सर्व प्रकार घडला. व्हिडिओमध्ये मोठा जमाव बसमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. तथापि, या व्यक्तीने वाहनाच्या मागे उभा राहून उतरण्यास नकार दिला. (हेही वाचा - Gurugram Dangerous Stunt Video: गुरुग्राममध्ये भरधाव कारवर फोडले फटाके, जीवावर बेतणारा स्टंटटचा व्हिडिओ व्हायरल)

हा धोकादायक स्टंट पाहून नागरिक हैराण झाले आहेत. अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला असून तो ऑनलाइन शेअर केला. वैयक्तिक आणि रस्ता सुरक्षेशी तडजोड करणारी अशी कृत्ये टाळण्यासाठी हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Dangerous Video- Local Train Stunt: मुंबई लोकल ट्रेन कुर्ला स्टेशनला उतरताना स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल)

तथापी, या वर्षाच्या सुरुवातीला अशाच स्वरूपाचा आणखी एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला होता. यात दोन तरुण धोकादायकपणे उभे राहून चालत्या बेस्ट बसच्या मागच्या बाजूला एका छोट्याशा कड्याला धरून उभे असलेले दिसले होते.