'दोन कानाखाली खाशील,' ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या व्यक्तीला केंद्रीय मंत्र्यानी दिले उत्तर; पहा व्हायरल व्हिडिओ
Union Minister Prahlad Patel (PC - Facebook)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात दररोज लाखो रुग्णांची वाढ आहे. अशातचं रुग्णांच्या उपचारांसाठी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. दरम्यान, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रह्लाद पटेल (Union Minister Prahlad Patel) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आजारी आईसाठी ऑक्सिजन सिलिंडर मागणार्‍या एका व्यक्तीला त्यांनी 'दोन कानाखाली खाशील,' असा इशारा दिला आहे.

या घटनेवरून विरोधकांनी मंत्र्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडिओनंतर पटेल यांनी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दोन दिवस आधी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर लुटल्यानंतर पटेल रुग्णालयात भेटीसाठी आले होते. (वाचा- अहमदनगर मधील डॉक्टारांचे Prescription Viral; ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये म्हणून औषधांसोबत दिला 'हा' खास सल्ला (See Pic))

या दरम्यान, एका व्यक्तीने आपल्या कोविड पीडित आईसाठी ऑक्सिजन सिलिंडर देण्याची मागणी पटेल यांच्याकडे केली. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, जेव्हा संभाषण दरम्यान त्या व्यक्तीने पटेल यांच्याकडे बोट उगारले, तेव्हा संतप्त मंत्र्याने त्याला खाली बोट दाखवण्याचा इशारा केला आणि म्हणाले, 'तू असं बोलशील तर दोन तोंडात खाशील.'

मध्य प्रदेशमध्ये गुरुवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 12,384 नवीन प्रकरणे नोंदली गेली. त्याबरोबर आतापर्यंत राज्यात या विषाणूची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या 4,59,195 वर पोहोचली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत राज्यात या आजारामुळे आणखी 75 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या 4,863 झाली आहे.