अवघ्या 13 व्या वर्षी त्याने दुबईत सुरु केली स्वतःची कंपनी !
आदित्यन राजेश (Photo Credit: Facebook)

दुबईत राहणाऱ्या 13 वर्षांच्या भारतीय मुलाने दुबईत स्वतःची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी (Software Development Company) सुरु केली आहे. इतकंच नाही तर चार वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्याने पहिलं मोबाईल अॅप्लिकेशन (Mobile App) बनवलं. त्याचा हा पराक्रम नक्कीच सर्वांना थक्क करणारा आहे.

आदित्यन राजेश (Aadithyan Rajesh) असे या मुलाचे नाव असून तो मुळाचा केरळचा आहे. मात्र सध्या तो दुबईत स्थित आहे. 9 वर्षांचा असताना त्याने छंद म्हणून पहिले मोबाईल अॅप्लिकेशन बनवले. त्याचबरोबर तो अनेक ग्राहकांसाठी लोगो, वेबसाईट्स डिझाईन करतो.

खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार, पाच वर्षांचा असल्यापासून तो संगणक वापरु लागला. त्यानंतर वयाच्या 13 व्या वर्षी त्याने 'ट्रिनेट सोल्यूशन्स' या कंपनीची सुरुवात केली. आदित्यनच्या ट्रिनेट कंपनीत एकूण तीन कर्मचारी आहेत. ते आदित्यनचे मित्र आणि विद्यार्थी आहेत.

माझा जन्म केरळमधील थिरुविल्ला येथे झाला. मी पाच वर्षांचा असताना माझे कुटुंब दुबईत आले.

कंपनीचा अधिकृत मालक बनण्यासाठी मला वयाची 18 वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे. तरी देखील आम्ही आतापर्यंत 12 हून अधिक क्लायंटसह काम केले आहे. त्याचबरोबर त्यांना आमच्या डिझाईन्स आणि कोडिंग सेवा विनामुल्य दिल्या आहेत, असे आदित्यनने दुबईतील एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.