महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई टोळीने घेतली होती. या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शूटरचाही या टोळीशी संबंध असल्याचा दावा करण्यात येत आहे. असे असतानाही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा ताबा मिळवण्यात मुंबई गुन्हे शाखेला सातत्याने अडचणी येत आहेत. याचे मुख्य कारण गृहमंत्रालयाचा आदेश आहे, ज्यात बिश्नोई याची साबरमती कारागृहातून बदली करण्यास मनाई करण्यात आली आहे.
...