Zomato Pure Vej Fleet (X/@deepigoyal)

एक प्रमुख ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीने (Zomato Introduces) 'प्युअर व्हेज मोड' (Zomato Pure Veg Mode) आणि 'प्युअर व्हेज फ्लीट' (Zomato Pure Veg Fleet) चे अनावरण केले आहे. जे ग्राहक शाकाहारी (Vegetarian ) आहेत त्यांना केवळ शाकाहारी हॉटेल्स किंवा उपहारगृहातून खाद्यपदार्थ मागवणे सोपे जाईल. देशभरातील शाकाहारी ग्राहकांच्या मागणीस प्रतिसाद देत कंपनीने हे पाऊल टाकले आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter) वर ही माहिती दिली. तसेच, त्यांनी ग्राहकांची मागणी आणि विविध आहारातील प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या वचनबद्धतेवर जोर दिला.

दीपंदर गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकाहारी ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात, झोमॅटोने 'प्युअर व्हेज मोड' सादर केले आहे. जे केवळ शाकाहारी जेवण देणाऱ्या रेस्टॉरंट्सची निवड करते. भारतामध्ये शाकाहारी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या मागण्या विचारात घेऊन सेवा देणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही ही महत्त्वाची प्रणाली सुरु केल्याचे ते म्हणाले. (हेही वाचा - Zomato वरुन आता एकाच वेळी अनेक रेस्टॉरंटमधून ऑर्डर मागवणे होणार शक्य)

गोयल यांनी स्पष्ट केले की नवीन सेवा शाकाहारी खाद्यपदार्थांवर लक्ष केंद्रित करते. असे असले तरी आम्ही कोणत्याही प्रकारे धार्मिक किंवा राजकीय भूमिका अथवा मतांना अनुसरुन अथवा त्यावर आधारित भेदभाव करत नाही. आमच्यासाठी सर्व ग्राहक समान आहेत. फक्त त्यांच्या आवडीनिडीनुसार खाद्यपदार्थ त्यांना ऑर्डर करता यावे यासाठी ही सेवा आहे. त्यांनी ग्राहकांना आश्वासन दिले की 'प्युअर व्हेज मोड' आणि 'प्युअर व्हेज फ्लीट' हे सर्वसमावेशक उपक्रम आहेत ज्यांची रचना शाकाहारी आहाराची प्राधान्ये असलेल्या व्यक्तींसाठी जेवणाचा अनुभव वाढवण्यासाठी केली गेली आहे. (हही वाचा, Zomato Introduces Kurta Uniforms For Women: झोमॅटोने महिला डिलिव्हरी पार्टनर्ससाठी लाँच केला नवीन कुर्ता (Watch Video))

गोयल यांनी विशिष्ट ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झोमॅटोच्या भविष्यातील योजनांची रूपरेषा सांगितली. यातील एक भाग म्हणजे ग्राहकांना खाद्यपदार्थ पोहोचवताना वाहतुकीदरम्यान त्यांची गळती होणे, पदार्थांना हाणी पोहोचण या बाबी टाळण्यावर भर दिला जाणार आहे. उदा. केकची वाहतूक हानी न होता सुरक्षित आणि सुनिश्चित करण्यासाठी हायड्रॉलिक बॅलन्सरने सुसज्ज समर्पित केक वितरण लॉन्च केले जाणार आहे. झोमॅटोची नवकल्पना आणि ग्राहकांच्या समाधानासाठी वचनबद्धता दर्शविणारा ही विशेष केक वितरण प्रणाली येत्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहे.

झोमॅटो ही एक ऑनलाईन ऑर्डर स्वीकारुन ग्राहकांना खाद्यपदर्थ पूरवणारी कंपनी आहे. ही कंपनी संपूर्ण भारतातील प्रमुख शहरांमध्ये सेवा देते. त्यासोबतच जगभरातील इतरही काही देशांमध्ये कंपनीने अलिकडे आपले जाळे निर्माण केले आहे.