Pune Zika Virus: पुणे शहरात झिका व्हायरसच्या(Zika Virus) वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत पुणे शहरात झिकाचे 66 रुग्ण आढळून आले (Zika Virus Cases in Pune)आहेत. यात चार जणांचा मृत्यू झाल्याचा ही अंदाज आहे. त्याबाबतची तपासनी सध्या सुरू आहे. काळजीचीबाब अशी की या रुग्णांमध्ये 26 गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे. त्याशिवाय, यात लहान मुलांचाही समावेश आहे. पुण्यात झिकाचा धोका आणि त्यातच पाऊस सुरू असल्याने आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वाढत्या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉइडसारखे आजार डोक वर काढत आहेत. झिकाचा प्रसार रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. (हेही वाचा:Zika Cases in Maharashtra: राज्यात झिका आजाराच्या रुग्णांची संख्या 25 वर; डासांसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ देवू न देण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन, जाणून घ्या कशी घ्याल काळजी )
दोन वर्षांखालील आणि दहा वर्षांवरील मुलांमध्ये डेंग्यु होण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्ये डेंग्यु वाढत असल्याचं समोर आलं आहे. अंगाला सूज येणे, प्लेटलेट्स कमी होणे, तीव्र डोकेदुखी, पुरळ येणे अशी लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय. (हेही वाचा:Zika Virus Causes, Symptoms, Prevention: झिका व्हायरस म्हणजे काय? जाणून घ्या डासांपासून होणार्या या आजाराची लक्षणं, उपचार आणि कधी घ्याल डॉक्टरांचा सल्ला! )
डहाणूकर कॉलनी, पाषाण, आंबेगाव बु तसेच कर्वेनगर आणि खराडी परिसरातही झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले. झिकाची वाढती रुग्णसंख्या पाहता पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला. पुणे शहरात सुरुवातीला एरंडवणे भागात झिकाचे 4 रुग्ण आढळून आले होते. यापैकी दोन रुग्ण गर्भवती महिला होत्या. त्यानंतर मुंढव्यातील कोद्रे वस्ती परिसरात पुन्हा झिकाचे दोन नवीन रुग्ण आढळले. यानंतर शहरात झपाट्याने झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली.