Nigdi Shocker: पुण्यातील (Pune) निगडी भागात एका 31 वर्षीय तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मित्रांसोबत मैदानात क्रिकेट खेळत असताना, त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना निगडी भागातील प्रधिकरण येथे घडली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. हेही वाचा- धक्कादायक! आयटी फर्ममध्ये काम करणाऱ्या 40 वर्षीय तरुणाचा कार्यालयातील वॉशरूममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार,अभिजीत गोवर्धन चौधरी असं मृत तरुणाचे नाव आहे. अभिजीत मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता, त्यावेळीस क्रिकेट खेळत असताना अचानक त्यांला अस्वस्थ वाटू लागले. त्याच्या छातीत दुखू लागले. मित्रांच्या मदतीने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उशिर झाल्यामुळे रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
निगडी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. पोलिस अधिकारी शत्रुघ्न माळी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात अभिजीत यांचा मृत्यू क्रिकेट खेळत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला. अभिजीतच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंब आणि मित्र परिसरात शोक पसरला आहे. अभिजीत इंजिनियर म्हणून प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. नागपूरमध्ये देखील कार्यालयात काम करत असताना तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान लहान मोठ्यांमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे.