Avinash Bhosale | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना PMLA Case मध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) अखेर 2 वर्षांनी जामीन मंजूर झाला आहे. ईडी (ED) कडून दाखल करण्यात आलेल्या मनी लॉडरिंग प्रकरणामध्ये Yes Bank-Dewan Housing Finance Limited च्या कर्जात घोटाळा केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. ईडीकडून अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

ईडी कडून अविनाश भोसले यांना 28 जून 2022 रोजी अटक करण्यात आली होती. अविनाश भोसलेंना सीबीआय कडून 26 मे 2022 रोजी अटक केली होती, त्यानंतर, याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने भोसले यांना अटक केली होती. दरम्यान सीबीआय च्या प्रकरणामध्ये मागील वर्षी मे महिन्यात भोसले यांना जामीन देण्यात आला होता.

अविनाश भोसले यांना जामीन

मुंबई सत्र न्यायालयाने मागील वर्षी जामीन फेटाळल्यानंतर अविनाश भोसले जामीनासाठी हायकोर्टात गेले होते. त्यावर आज निकाल देताना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अविनाश भोसले यांना परवानगीविना भारता बाहेर जाण्यास मनाई करत तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.