Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

Maharashtra Rain Alert : राज्यात मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचे(Maharashtra Rain) पुनरागमन झाले आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह मुळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसात स्व:ताची काळजी घेऊनच घारबाहेर पडणे सोयीचे राहील. मुंबईतही पहाटेपासून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. सकाळी पावसाच्या हलक्या सरी शहर आणि उपनगरात बरसल्या. (हेही वाचा:Maharashtra Rain: राज्यात पावसाचा धुमाकुळ, पुण्यात अनेक भागात पाणी साचले; यवतमाळमध्ये दुचाकी वाहून गेल्या )

आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुबार आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्याम, काल पुण्यासह, नाशिक, यवतमाळ आणि अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले होते. गुडघाभर पाण्यातून नागरिकांनी वाट काढत घर गाठले. यवतमाळमध्ये नद्यांचे पाणी पूलावर पोहोचल्याने काहींच्या दुचाकी वाहून गेल्या होत्या. नाशिकमध्ये काहींच्या घरात पाणी शिरले होते.(हेही वाचा: Nashik Rains: नाशिकमध्ये पावसाचं रौद्ररूप, मुंबई-नाशिक महामार्ग पाण्याखाली (Watch Video))

भारतीय हवामान खात्याने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा. तसेच सांगली जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.