Nashik Rains: राज्याच्या काही भागात सध्या पावसाचे थैमान(Nashik Rains) पहायला मिळत आहे. पुण्यात काल जोरदार पाऊस झल्यानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला आहे. अचानक आलेल्या पावसामुळं सर्वांचीच दाणादाण उडाली. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नाशिक शहरातील रस्ते जलमय झाले होते. सिडको, गोविंद नगर, कॉलेज रोड, गंगापूर रोड, पाथर्डी परिसरात मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे भुयारी गटार ओव्हरफ्लो झाल्यानं पाणी थेट गोदावरी नदीपात्रात घुसलं. त्याशिवाय पाणी बाजारपेठांमध्ये घुसल्याच चित्र आहे. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्ग (Mumbai-Nashik Highway)आणि शहरातील रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. (हेही वाचा:Delhi Heavy Rain: मुसळधार पावसात अडकलेल्या बोटी आणि 11 जणांची तटरक्षक दलाने केली सुटका)

व्हिडीओ पहा:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)