
फर्निचर (Furniture) कंपन्यांमध्ये जगातील सर्वात मोठी कंपनी आइकिया (IKEA) भारतात आपले दुसरे मोठे स्टोर सुरु करणार आहे. याआधी हैदराबाद मध्ये IKEA पहिले स्टोर सुरु झाले होते. त्यानंतर आता नवी मुंबईत आइकियाचे दुसरे स्टोर सुरु होणार आहेत. मुंबईकर गेल्या कित्येक वर्षांपासून IEKA चे स्टोर मुंबईत यावे यासाठी प्रतीक्षा करत होते. ही प्रतीक्षा आता संपली असून येत्या 18 डिसेंबरला हे स्टोर नवी मुंबईत सुरु होणार आहे. 2020 हे वर्ष मुंबईकरांसाठी म्हणावे तितके चांगले नव्हते. मात्र या वर्षाअंती या गोड बातमीने वर्षाचा शेवट नक्कीच गोड होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 2018 मध्ये भारतामध्ये हैदराबाद येथे पहिले IEKA स्टोर सुरु झाले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून IKEA चे स्टोर भारतात यावे यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. नवी मुंबईत सुरु होणारे हे स्टोर 5 लाख स्क्वेअर फिट चे असून यात 7000 हून अधिक फर्निशिंग प्रोडक्ट्स असणार आहेत. यात तुम्हाला रास्त भावात उत्कृष्ट दर्जाचे फर्निचर उपलब्ध होईल.
हेदेखील वाचा- मुंबई: BEST च्या ताफ्यात दाखल झाल्या 26 नव्या इलेक्ट्रिक बस; पहा काय आहे खास!
हे स्टोर ठाणे-बेलापूर रोडवर असेल. तुर्भे स्टेशनपासून अगदी 600 मीटर अंतरावर हे स्टोर असणार आहे. येथे ग्राहक आपल्या सोयीनुसार, आपल्या आवडीचे फर्निचर खरेदी करु शकतात. येथे ग्राहकांना IKEA चे आयकॉनिक प्रोडक्ट्स BILLY बुक केस, MALM बेड, EKTORP सोफा सारखे एकाहून एक सरस प्रोडक्ट्स पाहायला मिळतील.
मुंबईमध्ये IKEA चे ऑनलाईन स्टोर आहेच पण या ऑफलाईन स्टोरमुळे ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध होतील. तसेच या स्टोरमुळे महाराष्ट्रात 2030 ते 6000 नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.