Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

दिवा रेल्वे स्थानकात (Diva Railway Station) महिला प्रवाशांनी 'रेल रोको' (Rail Roko) केल्यामुळे मुंबई मध्य रेल्वे (Mumbai Central Railway) मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रवास करत असताना दरवाजा आगोदरच्या स्टेशनवरुन प्रवास करणारे महिला प्रवासी दरवाजा अडवून धरतात. त्यामुळे पुढच्या स्टेशनवर इतर महिलांना रेल्वे डब्यात चढता येत नाही. त्यामुळे दरवाजा अडवून धरणाऱ्या महिलांविरोधात इतर महिला प्रवाशांनी रेल रोको केला आहे.

महिलांच्या रेल रोकोमुळे मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक रखडली आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची मोटी गर्दी उसळली .

रेल रोको करणाऱ्या महिलांचे म्हणने काय?

रेल रोको करणारे महिला प्रवाशी प्रचंड संतप्त स्थितीत पाहायला मिळत आहेत. कर्जत, कसारा, कल्याण रेल्वे स्टेशनवरुन सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या दिवा स्टेशनमध्ये थांबतात. मात्र, कर्जत, कसारा, कल्याण रेल्वे स्टेशनवरुन प्रवास सुरु करणाऱ्या काही महिला दरवाजा अडवून ठेवतात. त्यामुळे इतर महिलांना डब्यात जागा असूनही प्रवेश मिळत नाहीत. नियमित घडणाऱ्या या प्रकारामुळे पीडित महिलांनी संताप व्यक्त करत रेल रोको केला. (हेही वाचा, रेल्वे आणि विमानसेवा कंपनीकडून आचारसंहितेचा भंग; निवडणूक आयोगाकडून रेल्वे, उड्डाण मंत्रालयाला कारवाईचे आदेश)

दरम्यान, संतप्त महिलांनी 10 मिनिटे रेल रोको केला. त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरु झाली. मात्र, सध्या या मार्गावरील वाहतूक सुमारे 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरु आहे.