Representative Image (Photo Credits: PTI)

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद वाक्याचे पालन करून जनतेच्या सेवेसाठी, त्यांच्या रक्षणासाठी 24X7 कार्यरत असलेल्या पोलिसांच्या गाडीचे स्टेअरिंग आता लवकरच महिलांच्या हातात येणार आहे. ABP माझा ने दिलेल्या बातमीनुसार, यवतमाळ (Yavatmal) जिल्हा पोलीस दलातील 11 महिलांचे लवकरच वाहन चालकाचे प्रशिक्षण लवकरच पूर्ण होत असून त्या जिल्हा पोलीस दलातील मोटार परिवहन विभागात लवकरच रुजू होणार आहेत. ही अत्यंत आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट असून या महिलांचे हे धाडसी पाऊल अन्य महिलांना प्रेरणादायी ठरेल. आतापर्यंत या विभागात पुरुषच वाहनचालक म्हणून काम करायचे.

वेगवेगळ्या भागातून परिस्थितीतून या महिला पोलीस दलात दाखल झाल्या असून शेतकरी कुटुंबातील या महिला आणि मुली शिपाई म्हणून जिल्हा पोलीस दलात रुजू झाल्या आहेत. दरम्यान पोलीस दलात महिलांसाठी 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर विभागात अनेक महिला दाखल झाल्या आहेत. प्रत्येक भरती प्रक्रियेमध्ये पोलीस दलात नोकरी मिळावी म्हणून हजारो महिला यात सहभागी होतात.

हेदेखील वाचा-Coronavirus: कोरोना व्हायरस विरुद्धचा लढा यशस्वी जिंकल्यावर महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्याने सांगितला अनुभव (Video)

हे आमच्यासाठी एक चॅलेंज होतं आणि सुरुवातीला आम्हाला थोडी भीतीही वाटली. पण काहीतरी वेगळं करायचे असं आम्ही मनाशी पक्क् केलं होतं, असं या महिलांनी ABP माझाशी बोलताना सांगितले.

या सर्व महिलांचे पुणे जिल्ह्यात चालक प्रशिक्षण केंद्र येथे 45 दिवसांचे जानेवारी दरम्यान ट्रेनिंग पूर्ण झाले. त्यानंतर कोरोना संकटामुळे त्या सर्वांना बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. आता मात्र या सर्व महिला मोटार परिवहन विभागात त्या रुजू झाल्या असून त्यांनी सराव सुरु केला आहे.