Woman Molested in Flight: पुणे- नागपूर विमानप्रवासात महिलेचा विनयभंग; आरोपी अटकेत

पीडीत महिलेने घडल्या प्रकाराची माहिती फ्लाईट स्टाफला दिली. विमानतळावर उतरल्यानंतर तिने सोनगाव पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली. त्याआधारे आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|
Woman Molested in Flight: पुणे- नागपूर विमानप्रवासात महिलेचा विनयभंग; आरोपी अटकेत
Arrest pixabay

विमानामध्ये प्रवासही आता सुरक्षित राहिलेला नाही. मागील काही महिन्यांमध्ये सहप्रवाशांकडून अनेकांना गैरवर्तवणूक मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. आता अशीच एक घटना पुणे-नागपूर फ्लाईट मध्ये झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी महिला प्रवाशाला त्रास दिल्याप्रकरणी अटक केली आहे. सोमवारी पुणे ते नागपूर फ्लाईट (Pune-Nagpur Flight) मध्ये हा प्रकार घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 40 वर्षीय महिलेच्या विनयभंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचं नाव Firoz Sheikh Noor Mohammad Sheikh आहे. हा 32 वर्षीय आरोपी कोंढवा दुराई कॉम्प्लेक्स मिठानगरचा रहिवासी आहे. शेख हा इंजिनियर आहे. पुढील महिन्यात त्याचं लग्न होनार आहे. नागपूर मध्ये कामसाठी तो कोराडी मधील वॉटर प्लॅंटला भेट देण्यासाठी जात होता.

नागपूर पोलिसांच्या माहितीनुसार, हा आरोपी 40 वर्षीय महिला प्रवासीच्या शेजारी बसला होता. नागपूर विमानतळावर विमान लॅन्ड होत असताना सुरूवातीला त्याने तिच्याकडे पाहिलं. नंतर त्याने काही अश्लील हावभाव केले. पुढे जाऊन त्याने तिचा लैंगिक छळ केला. नक्की वाचा: मल्याळम अभिनेत्री Divya Prabha सोबत Air India Flight मध्ये मद्यप्राशन केलेल्या सहप्रवाशाकडून गैर वर्तन ; पोलिस तक्रार दाखल .

पीडीत महिलेने घडल्या प्रकाराची माहिती फ्लाईट स्टाफला दिली. विमानतळावर उतरल्यानंतर तिने सोनगाव पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी कलम 354, 354A आणि 509 अंतर्गत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन आरोपीला बेड्या घातल्या. सध्या आरोपी जेलमध्ये आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel