
Mumbai : एका महिलेने 17 वर्षीय मुलासोबत आपण लग्न केले आहे. या महिलेला लहान मुलगी असून 17 वर्षीय मुलगा तिचा बाप असल्याचा दावा करत असल्याची विचित्र घटना घडली आहे. तर या प्रकरणी आरोपी महिलेची पोलिसांनी तुरुंगात रवानगी केली आहे.
मुंबईत राहणाऱ्या एका 22 वर्षीय महिलेचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तसेच तिला पाच वर्षाची लहान मुलगी सुद्धा आहे. परंतु तिच्या घराच्या जवळ राहणाऱ्या 17 वर्षीय मुलासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचे ती सर्वांना सांगत फिरत असे. तसेच लहान मुलीचा बाप हा 17 वर्षीय मुलगा असल्याचा ही आरोप या महिलेने त्याच्यावर केला आहे. तर पीडित मुलगा आणि महिला गेली दोन वर्षांपासून एकमेकांना ओळत होते. आमच्या दोघांमध्ये लैंगिक संबंध असल्याचे या महिलेने सर्वांना सांगितले. एवढेच नाही तर या महिलेने पीडित मुलाच्या घरच्यांना असे सांगितले की, 'तुमचा मुलगा मला पत्नी म्हणून स्विकार करणार नसेल तर मी आत्महत्या करीन' असे वारंवार धमकावत होती. त्यामुळे पीडित मुलाच्या घरच्यामंडळींनी त्याला या प्रकरणाबद्दल विचारले असता त्याने आमच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध किंवा लैंगिक संंबंध कधीच आले नाही असे स्पष्ट केले.
या प्रकरणी पीडित मुलाच्या घरातील मंडळींनी या महिलेविरुद्ध पोक्सो अॅक्टनुसार(Poxo Act) गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांनी महिलेची कसून चौकशी करुन ती खोटे बोलत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या आरोपी महिलेची रवानगी आता भायखळाच्या तुरुंगात करण्यात आली आहे.