धक्कादायक! लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार; चौघांना अटक
Physical Torture | File Image (Representational Image)

लोकमान्य टर्मिनसला (Lokmanya Tilak Terminus)जाणाऱ्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडित महिला सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास कुर्ला (Kurla)स्थानकाहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे पायी चालत जात असताना ही घटना घडली. दरम्यान, घटनास्थळावरून जाणाऱ्या एका महिलेने 100 क्रमांकावर फोन फिरवून पोलिसांना बोलवून घेतले आणि पीडित महिलेची मदत केली. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

सोनू तिवारी आणि निलेश बारसकर असे मुख्यआरोपींचे नाव असून पीडित महिला ही लघुशंकेसाठी साबळे नगर येथील झाडीमध्ये गेली असताना आरोपींनी पीडित महिलेला जबरदस्ती ओढून घेतले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान त्याठिकाणाहून जात असताना आरोपी सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले यांनीही पीडित महिलेवर दुष्कर्म केले. त्यावेळी आरोपींनी पीडित महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिच्याकडील रोख रक्कम आणि मंगळसूत्र हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी घटनास्थळावरुन जात असताना एका महिलेने त्या ठिकाणी धाव घेत पीडिताची मदत करत स्थानिक पोलिस ठाण्यात कळवले. हे देखील वाचा-ठाणे: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला 7 वर्षीची शिक्षा

एएनआयचे ट्विट-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून ती आपले गाव उत्तर प्रदेश येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जात होती. त्यावेळी ही घटना घडली. नेहरू नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय दंड विधयेक कलम 376, 377, 394 अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.