चोरांकडून (Theft Case) जप्त केलेल्या वस्तू विकून अनधिकृतपणे लाखो रुपयांची कमाई केल्याप्रकरणी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. आरोपी महिला महाराष्ट्राच्या (Maharashtra) पालघर (Palghar) जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलीस ठाण्यात रिक्व्हर होऊन आलेल्या वस्तूंची संबंधित महिला हेराफेरी करीत असल्याचे तिच्यावर आरोप आहे. या घटनेनंतर एकच खळबळ माजली असून याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
न्यूज ऐजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पालघरच्या वसई येथे चोरी प्रकरणात जप्त केलेल्या वस्तूंची हेराफेरी केल्याप्रकरणी एका महिला हवालदारला पोलिसांनी अटक केली आहे. या जप्त केलेल्या वस्तूच्या माध्यमातून संबधित महिलेले 26 लाख रुपये कमवले आहेत. यासंदर्भात सिनिअर इंस्पेक्टर कल्याण करपे यांनी माहिती दिली आहे. या घटनेननंतर पोलीस प्रशासनाला मोठा धक्का लागला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. हे देखील वाचा- Thane: मोबाईल घेण्याच्या बहाण्याने लंपास केले दोन महागडे मोबाईल; घटना सीसीटीव्हीत कैद
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला हवालदार गेल्या सहा वर्षांपासून जप्त केलेल्या वस्तूंची हेराफेरी करीत असल्याचे पोलीस चौकशीतून स्पष्ट झाले आहे. चोरी प्रकरणात जप्त झालेल्या वस्तूंची ती हेराफेरी करीत होती. ऑडिट दरम्यान या घटनेची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित महिला हवालदार यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.