मुंबईत (Mumbai) अजूनही अनेक ठिकाणी लोकांना कोरोना व्हायरसचे (Coronavirus) गांभीर्य समजले नसून अनेकजण सोशल डिस्टंसिंगचा (Social Distancing) नियम सर्रासपणे मोडताना दिसतात. त्याचा परिणाम मुंबईतील कोरोना संक्रमितांच्या संख्येवर दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात मुंबईत कोरोनाचे 2267 नवे रुग्ण आढळले असून 52 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,80,542 वर (COVID-19 Positive) पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 8372 वर (COVID-19 Death) पोहोचली आहे. मुंबईत सद्य घडीला 34,136 (COVID-19 Active Cases) रुग्णांवर उपचार सुरु आहे.
तर दुसरीकडे दिलासादायक गोष्ट म्हणजे मुंबईत आज 925 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1,37,664 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात (COVID-19 Recovered Cases) केली आहे. यामुळे मुंबईत रुग्ण बरे होण्याचे दर 76% इतका झाला आहे. तर कोविड वाढीचा दर 1.25% इतका झाला आहे. Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात मागील 24 तासांत 405 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू, राज्यातील मृतांचा एकूण आकडा 31 हजार 791 वर
१८ सप्टेंबर, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/LRsrFVqO7G
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 18, 2020
मुंबईमध्य कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे आता मुंबईत (Mumbai) येत्या 30 सप्टेंबर कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने अगोदरच 31 ऑगस्ट पर्यंत जमावबंंदी लागु केली होती ज्यात ही वाढ करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त मुंबईत पोलिसांकडून कोणत्याही नव्या नियमांची अमंलबजावणी करण्यात आली नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.
तर महाराष्ट्रात मागील 24 तासांत 21,656 नवे रुग्ण आढळले असून 405 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 लाख 67 हजार 496 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 31 हजार 791 वर पोहोचला आहे. राज्यात सद्य घडीला 3 लाख 887 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.