विधीमंडळ आणि विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु होणार आहे. तसेच या अधिवेशनाचा कार्यकाल 30 नोव्हेंबर पर्यंत ठेवण्यात आला आहे. तर रविवार, ईद आणि गुरु नानक जयंती निमित्त सुट्ट्या वगळता याचे आठ दिवस याचे काम चालू राहणार आहे.
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळ, कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि मंत्र्यावर झालेले आरोप हे मुद्दे या अधिवेशनात प्रामुख्याने मांडले जाणार आहेत. त्यामुळे विरोधक सरकारवर जोरदार टीका करण्याच्या तयारीत आहेत. तसेच विधानसभेतील प्रलंबित आठ आणि विधान परिषदेची दोन प्रलंबित विधेयके यावेळी मांडण्यात येणार आहेत. मात्र दुष्काळावरचा मुद्दा हा प्रामुख्याने मांडला जाणार असून त्यावर एक विशेष चर्चा होणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या मुद्दांवर तोडगा निघण्यासाठी अधिवेशनाचा कार्यकाल हा तीन आठवड्यांचा असणे आवश्यक आहे. परंतु या अधिवेशनाचा कार्यकाल हा दोन आठवड्यांचा मुद्दाम ठेवण्यात आला असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील सर्व नेत्यांची बैठक आज संपन्न झाली. या सरकारने सामान्य नागरिकांचे जगणे अक्षरशः मुश्किल करून टाकले आहे. अधिवेशनात जनतेच्या वतीने सरकारला जाब विचारण्याची जबाबदारी आम्ही सर्व विरोधी पक्ष पार पाडू. pic.twitter.com/ILF5b9NuJZ
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 18, 2018
सध्याच्या अघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाल कमी दिवसांचा ठेवला असल्याचे दिसून येत आहे. तसेच युती सरकारच्या काळात एकाही वर्षी 300 तास काम झाल्याचे दिसून आले नाही आहे.