Abdul Sattar | (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन पहिल्या आठवड्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यात अधिक वादळी ठरल्याचं बघायला मिळत आहे. कालचं विधानसभेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न विरोधी ठराव महाराष्ट्रात विरोदक आणि सत्ताधाऱ्यांच्या एकमताने मंजूर झाला आहे. गेल्या महिन्यापासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सिमावादाने तोंड वर काढले होते. सिमाप्रश्नावरुन राज्यात सत्ताधारी विरुध्द विरोदक असा रोज कलगीतुरा बघायला मिळत होता. पण आता या साऱ्या चर्चांना पुर्णविराम लागला असुन काल सीमाप्रश्न विरोधी ठराव मंजूर करण्यात आला. तरी महाराष्ट्र कर्नाटक सिमावादानंतर हिवाळी अधिवेशनात चर्चेचा मुद्दा ठरत आहे तो सरकारी जमिनीच्या कथित बेकायदेशीर नियमितीकरणाचा. संबंधीत प्रकरणावरुन विरोधकांकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी आज हिवाळी अधिवेशनात केली जात आहे.

 

विधानसभेच्या दहाव्या दिवशी भल्या सकाळपासून शेतकरी हैराण सत्तार खातो गायरान, दिल मांगे मोर मंत्री आहेत चोर, नागपूरची संत्री भूखंड चोर मंत्री अशी जोरदार घोषणाबाजी होताना दिसत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी, हसन मुश्रीफ आक्रमक होत घोषणाबाजी करताना दिसत आहे. तरी आज विरोधकांच्या निशाण्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार आहेत हे स्पष्ट दिसत आहे. सत्ताधारी अब्दुल सत्तारांवरील आरोप खोडून काढण्यात यसस्वी होतील का किंवा विरोधक नेमक कुठला मुद्दा उचलुन धरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (हे ही वाचा:- Anil Deshmukh: तब्बल १ वर्ष १ महिन्यानंतर आज अनिल देशमुखांची सुटका होणार)

 

अब्दुल सत्तारांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून वाशीम जिल्ह्यातील 150 कोटींची 37 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिली. सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात होत असलेल्या 'सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.