अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार? पाहा काय म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार
Ajit Pawar (Photo Credit: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने आपल्या कार्यकाळातील शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी (First List of Farmer's Loan Waiver) सोमवारी जाहीर केली होती. तसेच दुसरी यादी उद्या 28 फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार आहे. विरोक्षीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीसचा लाभ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्यात 2 दिवसांपूर्वी कर्जमाफी योजनेला सुरुवात झाली आहे. येत्या 3 महिन्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा सरकार प्रयत्न करत आहेत, अशी माहिती समोर आला आहे. परंतु, या योजनेवर भाजने नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. राज्य सरकारने सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी शेतकरी कर्जमाफीची योजना लागू केली होती. पंरतु, या योजनेचा लाभ केवळ सप्टेंबर 2019 पर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे. त्यांना मिळणार आहे. मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे ऑक्टोबर 2019 नंतर कर्ज थकीत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच अशा शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत केली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला जाईल, अस आश्वासन दिले. राज्यात दोन दिवसांपूर्वी कर्जमाफी योजना सुरु झाली आहे. तीन महिन्यात ही कर्जमाफी देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असेही अजित पवार विधानसभेत म्हणाले आहेत. हे देखील वाचा- आदित्य ठाकरे यांच्या 'बांगड्या' वरील ट्विटवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, पतीवर केलेल्या वक्तव्यावर अशा शब्दांत दिले उत्तर

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ठाकरे सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारी रोजी जाहीर झाली झाली होती. शेतकरी कर्जमाफीच्या यादीत 68 गावांमधील 15 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी लिंक केल्यानंतरच कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येतील.