MNS New Flag: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत भाजपसोबत युती करणार? पक्षाच्या नव्या झेंड्यावरुन राजकीय चर्चांना उधाण
Raj Thackeray (Photo Credits: Instagram)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने आपल्या झेंड्याचा (MNS New Flag) केशरी रंग करणार असून त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत भाजपसोबत (BJP) युती करणार का? असाही प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 9 मार्च 2006 साली पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी मनसेने 2013 साली पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती. दरम्यान, मनसेचे 13 आमदार निवडणून आले होते. परंतु, त्यानंतर पक्षाची घसरण सुरु झाली. यामुळे पक्षात नवा बदल घडवून आणण्यासाठी मनसे आपल्या विचारात आणि धोरणात बदल करणार का? असाही प्रश्न महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला पडला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या बहुरंगी झेंड्यात बदल करणार असल्याचे वृत्त सर्वत्र झळकत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा स्वीकार करत प्राधन्याने केशरी किंवा भगवा रंगाचा झेंडा स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती समोरी आली आहे. तसेच या बदलामुळे मनसे आता हिंदुत्व स्वीकारून भाजपसोबत जाणार का? अशा चर्चांनी अधिक जोर धरला आहे. यातच मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजपर्यंत शिवसेनापासून ते शेकापपर्यंत सर्वच पक्षांना मदत केली आहे. परंतु, या सर्वांनी मनसेला किती मदत केली. तसेच आम्हाला त्याचा किती फायदा झाला हे तपासण्याची वेळ आली आहे. लोक बदल स्वीकारण्यास तयार असून भविष्यात कोणतीही समीकरण जुळू शकतात, असे वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. हे देखील वाचा-MNS New Flag: मनसेच्या नव्या झेंड्यावर येणार 'शिवराजमुद्रा'? 23 जानेवारीला राज ठाकरे करणार अनावरण

येत्या 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे या नव्या झेंड्याचे अनावरण करणार असल्याचे बोलले जात आहे. मनसेच्या जुन्या झेंड्यात मध्यभागी भगवा तर, वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूस हिरवा रंग आहे. मात्र मनसेच्या नवीन झेंड्यात भगवा किंवा केशरी रंग असण्याची शक्यता आहे. तसेच मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये मनेसचे निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन देखील नसणार अशीही माहिती समोर आली आहे.