Aaditya Thackeray Changes Twitter Bio: आदित्य ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार की त्यांना नवीन जबाबदारी दिली जाणार? ट्विटर प्रोफाइलमध्ये बदल केल्यानंतर चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्र सरकारमधील (Maharashtra Government) पर्यटन आणि पर्यावरण मंत्री (Minister of Tourism and Environment) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) गेल्या काही दिवसांपासून चर्चेच आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांबरोबरच सोशल नेटवर्किंगवरही आदित्य ठाकरे यांना सतत लक्ष्य करत विविध आरोप करण्यात आले आहे. मात्र, हा घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. यातच आदित्य ठाकरे यांनी आता आपल्या ट्वीटर प्रोफाइलमध्ये (Twitter Profile) मोठा बदल केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमधून पर्यटन आणि पर्यावरण मंत्री हे शब्द काढून टाकला आहे. यामुळे आदित्य ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार की त्यांचाकडे नवीन जबाबदारी दिले जाणार? अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेकडून याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आली नाही.

सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव जोडले जात आहे. विरोधी पक्षातील नेते आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर विविध आरोप करत आहेत . मात्र, आदित्य ठाकरे यांनी आपला याप्रकरणाशी काहीच संबध नसल्याचे सांगितले होते. दुसरीकडे याप्रकरणात अकडलेली रिया चक्रवर्तीने देखील आपण आदित्य ठाकरे यांना ओळखत नसल्याचे म्हटले आहे. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेत्वृात राज्यातील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री पदाची जबाबदारी संभाळत आहे. आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर प्रोफाईलवर, युवा सेनाचे अध्यक्ष, मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबाल असोसिएशनचे अध्यक्ष असे लिहण्यात आले आहे. हे देखील वाचा- देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र येणार, ही ब्रेकींग न्यूज; कोविड सेंटरचं उद्धाटन करताना अजित पवार यांची खोचक टिप्पणी

आदित्य ठाकरे यांची प्रोफाईल-

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा तपास मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवला आहे. या तपासादरम्यान आता दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान, या प्रकरणात भाजपाने कधीही आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले नसल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.