Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Mumbai Shocker: पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून 24 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना मानखुर्द येथे घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु करून आरोपी पतीला अटक केले आहे. मृत पत्नीच्या माहेरच्या कुटुंबानी असा आरोप केला की, सासऱ्या मंडळीकडून तरुणीला हुंड्यासाठी मारहाण केली जायची. त्यामुळे तरुणीने आत्महत्या केली असावी. तरुणीच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.  (हेही वाचा- जयपूरच्या एमपीएस इंटरनॅशनलसह अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या,)

मिळालेल्या माहितीनुसार, 10 मे रोजी पत्नीने आतून घराचा दरवाजा बंद केला होता. त्यानंतर पती घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना कोणताही प्रतिसाद येत नव्हता. शेवटी घराचा दरवाजा तोडल्यानंतर  महिला लटकेलल्या अवस्थेत आढळून आली होती. या प्रकरणी पोलिसांना खबर देण्यात आली होती.  पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पतीला चौकशीसाठी बोलवण्यात आले.

पतीच्या चौकशीतून असं उघड झाले की, महिलेला सासरच्या मंडळीकडून दररोज शिवीगाळ आणि मारहाण केली जायची. यालाच कंटाळून महिलेने आत्महत्या केली. महिलेचे गेल्या वर्षी लग्न झालं होत. लग्नच्या वेळीस पतीने सोनसाखळीची मागणी केल्याची माहिती आहे. तथापि, आर्थिक संकटामुळे  मुलीच्या कुटुंबाने फक्त ₹50,000 रोख आणि इतर वस्तू देऊ शकतात. लग्नानंतर महिला मॅडिकलमध्ये कामाला लागली परंतु तीचा पती सर्व पगार घेऊ लागला. तीला शारिरीक आणि मानसिक छळ देऊ लागला.

पतीच्या मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून पत्नीने टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवले. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबायाकडून संपात व्यक्त केला जात आहे. पोलिसांना या प्रकरणी 304 बी कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पतीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.