भाजप प्रदेशाध्यक्ष पद कोणाला मिळणार? पंकजा मुंडे यांच्यासह या नेत्यांची नावे चर्चेत
चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे (संग्रहित-संपादित प्रतिमा)

अखेर मोठ्या थाटामाटात नव्या मंत्रिमंडळाचा शपतविधी पार पडला. आज खातेवाटप होऊन कामाला सुरुवातही झाली आहे. महाराष्ट्रातील 7 नेत्यांची दिल्लीत वर्णी लागली आहे. त्यामुळे आता त्यांचे राज्यातील स्थान कोण भरून काढेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे पद म्हणजे महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष (Maharashtra President of BJP). रावसाहेब दानवे यांच्याकडे हे पद होते, मात्र आता त्यांची केंद्रीय राज्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद कोणाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या या शर्यतीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांची नावे चर्चेत आहेत. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा असाच विजय प्राप्त करण्यासाठी भाजपला राज्यात एक योग्य उमेदवाराची गरज आहे. सध्या चर्चेत असलेल्या नावांपैकी चारही लोकांचे स्थान आणि महत्व मोठे आहे, त्यामुळे पक्षाकडून नक्की कोणत्या नावाचा विचार होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, याबाबतीत पंकजा मुंडे यांना माध्यमांनी विचारले असता, ‘पक्ष जी जबबदारी देईल ती स्वीकारायला मी तयार आहे.’ असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले, यावरून पंकजा मुंडे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करत त्यांची पोस्टर्स जळगावात लावली आहेत. त्यामुळे गिरीश महाजन प्रदेशाध्यक्ष होतात की मुख्यमंत्री हे लवकरच कळेल. (हेही वाचा: पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर; ज्येष्ठांची खांदेपालट, नव्या चेहऱ्यांवर मोठी जबाबदारी)

महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना मिळालेली खाती  –

कॅबिनेट मंत्री 

नितीन गडकरी-परिवहन मंत्री

प्रकाश जावडेकर- पर्यावरण मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पीयूष गोयल- रेल्वे मंत्री, वाणिज्य आणि उद्योग

अरविंद सावंत - अवजड उद्योग मंत्रालय

राज्यमंत्री

रावसाहेब दानवे- ग्राहक संरक्षण

रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री

संजय धोत्रे- मनुष्यबळ