Raj Thackeray | (Photo Credits: YouTube)

Raj Thackeray On BMC: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मुंबई महापालिका प्रशासन नक्की कोण चालवतंय? आणि त्यांचं उत्तरदायित्व नक्की कोणाला आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केला आहे. बीएमसीने वांद्रे किल्ला ते माहिम किल्ल्यांपर्यंत बांधलेल्या सायकल ट्रकवर 165 कोटी रुपये खर्च केले आहेत. याला स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी देखील विरोध केला आहे. तरी देखील प्रकल्प रेटला जात असेल तर महानगरपालिका प्रशासन नेमकी कोण चालवतंय? असा प्रश्न उपस्थित झाल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.