आज कोकणात जाणार्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. आरामदायी आणि वेगवान प्रवास म्हणून अनेकजण रेल्वे प्रवासाची निवड करतात. पण आज (26 जून) कोकण रेल्वेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील भोके (Bhoke) आणि उक्षी (Ukshi) या स्थानकादरम्यान हजरत निजामुद्दीन - मडगाव जंक्शन राजधानी एक्सप्रेसला (Hazrat Nizamuddin-Madgaon Junction Rajdhani superfast special )अपघात झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील (Konkan Railway) वाहतूक खोळंबली आहे. राजधानी एक्सप्रेस रूळावरून घसरली आहे त्यामुळे हा खोळंबा झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, सकाळी सव्वा चारच्या सुमारास हजरत निजामुद्दीन ते मडगाव या राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचं चाक सरकलं आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान सध्या कोकण रेल्वे मार्गावर काही निवडक गाड्या धावत आहेत त्या एकापाठोपाठ एक थांबल्या आहेत. आज एकीकडे मुंबई- गोवा मार्गावर वशिष्ठी नदीच्या पुलावरील कामामुळे रस्ते वाहतूक देखील मंदावली असल्याने आता रेल्वे देखील खोळंबल्याने अनेकांना तिष्ठत राहावे लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. नक्की वाचा: डेक्कन कवीन, पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल; इथे पहा वेळापत्रक.
Front wheel of Hazrat Nizamuddin-Madgaon Junction Rajdhani superfast special (Delhi-Goa Rajdhani express) derailed in Ratnagiri at 4.15 am today. No injury or casualty report: Chief Public Relations Officer, Konkan Railway
— ANI (@ANI) June 26, 2021
दरम्यान पावसाचे दिवस असल्याने सध्या कोकण रेल्वे मार्गावर 10 जून पासून नव्या मान्सून स्पेशल वेळापत्रकानुसार ट्रेन्स चालवल्या जात आहेत. त्यामुळे भल्या पहाटे मुंबईत येणार्या काही गाड्या देखील स्टेशन मध्ये विविध स्थानकांत अडकल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून अपघाताची माहिती मिळताच तातडीने इंजिन हटवत रेल्वे सेवा सुरळीत करण्याच्य कामाला सुरूवात झाली आहे आणि वाहतूक लवकरच सुरू होईल असे देखील सांगण्यात आले आहे.