AC local trains (Photo Credit: PTI)

Western Railway Introduces More AC Locals: लोकप्रियता आणि प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने (Western Railway) मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये 6 नोव्हेंबरपासून एसी लोकल (AC Locals) गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 17 नवीन सेवा सुरू केल्याने, एसी गाड्यांची एकूण संख्या आता 79 वरून 96 वर जाईल. डहाणू मार्गावरील प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी डहाणू रोड ते अंधेरी लोकल ट्रेनचा एक जोडी चर्चगेटपर्यंत वाढवण्यात येत आहे.

प्रवाशांच्या फायद्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर आणखी 17 एसी सेवा वाढवण्यात येत आहेत. सेवांच्या एकूण संख्येत कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच 96 एसी लोकल ट्रेन सेवांसह 1,394 सेवांची संख्या आहे, असं पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Mumbai AQI: हवेची गुणवत्ता खालावली, मुंबईतील मरीन ड्राईव्ह, सीएसटी परिसरात धुक्याचा थर, (Watch Video))

दरम्यान, सुमित ठाकूर यांनी पुढे सांगितलं की, नव्याने सुरू करण्यात आलेल्या अतिरिक्त 17 सेवांपैकी नऊ चर्चगेटच्या दिशेने सेवा देतील. तर आठ लोकल विरारच्या दिशेने धावतील. एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे, प्रवाशांच्या फायद्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी, WR वर आणखी 17 एसी सेवा वाढवल्या जात आहेत. या सेवा सोमवारपासून एसी सेवा म्हणून चालतील. शुक्रवार ते शनिवार आणि रविवारी नॉन-एसी सेवा म्हणून धावतील.

तथापी, ठाकूर यांनी पुढे नमूद करताना सांगितलं की, सुरू करण्यात आलेल्या अतिरिक्त 17 लोकल नालासोपारा-चर्चगेट, विरार-बोरिवली आणि भाईंदर-बोरिवली दरम्यान प्रत्येकी एक सेवा, विरार-चर्चगेट दरम्यान दोन सेवा आणि बोरिवली-चर्चगेट दरम्यान चार सेवा आहेत. त्याचप्रमाणे, खाली दिशेने, चर्चगेट-भाईंदर आणि बोरिवली – विरार दरम्यान प्रत्येकी एक सेवा, चर्चगेट – विरार आणि चर्चगेट – बोरिवली दरम्यान प्रत्येकी तीन सेवा आहेत.