पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान आज आठ तासांचा विशेष रात्रकालीन ब्लॉक, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री आठ तासांचा विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर फेरेरे पूल पाडण्यासाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे ऑफिस मधून नागरिकांना आज थोडे लवकरच निघावे लागणार आहे. ब्लॉक दरम्यान 10 नंतर चर्चगेट- मुंबई सेन्ट्रल लोकल बंद राहणार आहेत. तसेच चर्चगेट येथून शेवटची विरार लोकल 10 वाजता सुटणार असून ती जलद गतीने धावणार आहे. मात्र धिम्या मार्गावरील शेवटची बोरिवली लोकल रात्री 9.51 मिनिटांनी चर्चगेट रेल्वेस्थानकातून सुटणार आहे. तसेच हा ब्लॉक आज आणि उद्या (9 फेब्रुवारी) कायम राहणार आहे.

चर्चगेट-मुंबई सेन्ट्रल दरम्यान रात्रकालीन ब्लॉक रात्री 10.15 मिनिटांनी सुरु होणार असून सकाळी 6.15 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर फेररे पुलासाठी गर्डनर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे परिणामी गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. तर गोरेगाव येथून 9.32 मिनिटांनी चर्चगेटला जाणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आज पश्चिम रेल्वे मार्गावरील खासकरुन चर्चगेट येथून घरी जाणार असल्यास आधी वेळापत्रक पहा.(जळगाव: तोल जाऊन खाली पडलेल्या तरुणाचा जीव वाचवण्यासाठी रेल्वे धावली उलटी)

Tweet:

तसेच रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान भायखळा-मांटुगा डाऊन जलद मार्गावर सकाळी 8.40 ते दुपारी 1.10 दरम्यान ब्लॉक असणार आहे. तर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी सुद्धा ब्लॉक असल्याने वेळेचे नियोजन करुन बाहेर जण्याचा प्लॅन करा.