भारतीय रेल्वे (फोटो सौजन्य-फेसबुक)

जळगाव येथे देवळी ते भुसावळ शटल मधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडला. त्यानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे उलटी धावल्याची घटना समोर आली आहे. सध्या जखमी तरुणावर एका खासजी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी घडली असली तरीही मोटरमनच्या हुशारीमुळे तरुणाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने कौतुक करण्यात येत आहे.पाचोरी येथे राहणारा राहुल पाटील हा तरुण जळगाव येथे शिक्षणासाठी दररोज अपडाऊन करतो. तर गुरुवारी सकाळच्या वेळेस देवळाली ते भुसावळ शटल मधून त्याचा तोल जात खाली पडला. त्यामुळे पाटील हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्या मित्रांनी आणि सहप्रवाशांनी तत्परता दाखवत रेल्वेची साखळी ओढून ट्रेन थांबवली.

ट्रेन थांबवल्यानंतर पाटील याला रेल्वेच्या डब्यात आणण्यात आले. मात्र मोटरमन याने पाटील याला वेळीच योग्य उपचार मिळावेत म्हणून ट्रेन उलटी चालवली. क्षणाचा विलंब न करता पाटील याला जळगाव मधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. (Video: ट्रेन प्रवासात बॅग गायब, मंत्री महोदय म्हणाले 'मोदी करत आहेत बॅगांची चोरी')

तर प्रत्येक दिवशी गर्दीने भरलेल्या लोकल मधून खाली पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अलीकडल्या काळात वाढले आहे. या मध्ये रेल्वे रुळ आलोंडणे, चालत्या लोकलमधून पडणे अशा सारख्या गोष्टी राज्यात घडत असतात. त्यामुळे प्रत्येक वर्षाला लोकलमुळे अपघात झालेल्या मृतांची आकडेवारी जाहिर करण्यात येते. तर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना रेल्वे प्रवासाबाबत वारंवार सुचना सुद्धा दिल्या जातात पण याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ही प्रकार घडत आहेत.