हवामान विभागाने आगोदरच पावसाचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज प्रत्यक्षात उतरत काल म्हणजेच पाच मार्चच्या पहाटे आणि मध्यरात्रीही अवकाळी पाऊस जोरदार बरसला. तत्पूर्वी नाशिक जिल्ह्यातील वातावरण काल दिवसभर ढगाळ होते. त्यानतर दिवस मावळ्यानंतर नाशिक जिल्ह्यात मेघगर्जना ऐकू येऊ लागली. रात्रीच्या वेळी विजांचाही कडकडाट होऊ लागला आणि त्यानंतर सुरुझालेल्या तुरळक पावसाने दमदारच हजेरी लावली. खास करुन त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात जोरदार पाऊस पडला. ज्यामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची बीती व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, मुंबई मध्ये यंदा होळीच्या सणावर पावसाचं सावट; हवामान खात्याचा 7 मार्चपासून हलक्या पावसाचा अंदाज)
अवकाळी पावसाचा फटका बसून अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. एका बाजूला शेतमालांना पिकांना मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दुसऱ्या बाजूला निसर्गाची साथ नसल्याने शेतकऱ्याला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने येत्या 8 मार्च पर्यंत राज्यातील विविध विभागांमध्ये दमदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी दमदार पाऊस पडू शकतो असे वर्तमान हवामान विभागाने वर्तवले आहे. दरम्यान, या काळात काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते असे आयएमडीने म्हटले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस ग्रामीण भागासाठी काहीसे महत्त्वाचे असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आयएमडीने हा अंदाच कोकण विभाग वगळून वर्तवला आहे.