Rains | | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

 Maharashtra weather Update : महाराष्ट्रात काही  दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक गावात शहरात  पुरस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार आज देखील राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून पुढील भागात  रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुरस्थितीमुळे नागरिकांची जवजीवन विस्कळीत झाली आहे. येते ४८ हे कायम पावसाचे असू शकता असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे. मुंबई, पुणे, पालघर या भागात अतिवृष्टी होणार आहे. पावसाने नागरिकांचे हाल झाले आहेत. मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस असणार आहे. त्यामुळे राज्यसरकारने सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे.

राज्यात पुढील २४ तासात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, पुणे, सातारा, नाशिक व यवतमाळ या जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. दक्षिण भागात देखील मुसळधार पावसाने कहर केला आहे. पुढील तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मागील दोन आढवड्यांपासून पावसाने चांगलीच बॅटींग केली आहे.  रायगड जिल्ह्याची परिस्थिती पाहता या जिल्ह्यात ऑरेंज अर्लट जारी केला आहे.

राज्यात काही जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभगाने दिला आहे. मुसळधार पावसामुळे गावातील नद्याच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे गावागावात पुरस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागात पाणी साचले, तर शहरातील काही भागात रस्तावर गुडघ्या पर्यंत पाणी साचले आहे. पुढील ४८ तासांत पावसाचा जोर कायम असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्यसरकाराने सर्तक  राहण्य़ाचा इशारा दिला आहे. पावसामुळे वाहतुकीसेवा सुध्दा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करणे  खुप मुश्किलीचे झाले आहे. चंद्रपुर, साताऱ्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.