Weather Forecast: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत बुधवारी संध्याकाळपासून संततधार पाऊस पडत असून, त्यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करत आज म्हणजेच गुरुवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. खराब हवामानामुळे अनेक उड्डाणे वळवण्यात आली असून रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. बुधवारीही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पुढील दोन दिवस अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज देशभरात हवामान कसे असेल ते जाणून घेऊया. IMD ने 26 सप्टेंबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. यासोबतच सौराष्ट्र, कच्छ, बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. हे देखील वाचा: PM Narendra Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर; Pune Metro, Solapur Airport सह 22,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे करणार राष्ट्रार्पण
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस देशाच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये हलका ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. या पावसामुळे काही भागात आर्द्रता आणि उष्णतेपासून दिलासा मिळणार असला तरी काही भागात पाणी साचण्याची समस्याही वाढू शकते.