Water Taxi (Photo Credits-Twitter)

Water Taxi Service in Mumbai: देशातील सर्वात पहिलीच वॉटर टॅक्सी सुविधा मुंबईत सुरु करण्यात आली आहे. याचा फायदा मुंबईसह नवी मुंबईतील नागरिकांना प्रवासासाठी होणार आहे. या सुविधेचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईतील बेलापूर येथे करण्यात आले. वॉटर टॅक्सी ही सुविधा सर्व मुंबईकरांसाठी सुखदायक आणि आरामदायी असणार आहे. खासकरुन जे नागरिक साउथ मुंबई ते नवी मुंबई अशा दोन्ही मार्गावरुन प्रवास करतात त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचसोबत ठाणे आणि रायगडवासियांसाठी सुद्धा ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे.

मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्र, शिपिंग आणि वॉटरवेज यांच्यानुसार, या वॉटर टॅक्सीच्या सुविधेमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच ही सुविधा अत्यंत आरामदायी असून दीर्घकाळ प्रवासाचा वेळ वाचला जाणार आहे.(Pune Metro: दिलासादायक! 6 मार्चपासून पुण्यात दोन्ही मार्गांवर सुरु होणार मेट्रो; PM Narendra Modi करणार उद्घाटन)

वॉटर टॅक्सीची वेळ-

वॉटर टॅक्सी ही वर्षातील 330 दिवस सुरु राहणार आहे. तसेच आठवड्यातील तीन दिवस या सुविधेचा फायदा घेता येणार आहे. याची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. वॉटर टॅक्सीच्या सुविधेच्या माध्यमातून 40-50 मिनिटांत प्रवास करता येणार आहे.

Tweet:

वॉटर टॅक्सी सुविधेचा मार्ग-

वॉटर टॅक्सीची सुविधा तीन मार्गाने चालवली जाणार आहे. त्यानुसार प्रथम फेरी घाट, माझगाव मधील क्रुज टर्मिनल आणि बेलापुर टर्निमल. दुसरा मार्ग बेलापूर आणि एलिफंटा गुंफा आणि तिसरा मार्ग बेलापूर आणि जेएनपीटी.

मुंबई वॉटर टॅक्सी भाडे-

वॉटर टॅक्सीच्या भाड्यासाठी थोडे अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. या स्पीडबोटचे भाडे 800 ते 1200 रुपये प्रति प्रवाशी असा एका मार्गासाठी असणार आहे. या प्रवासाला 40-50 मिनिटे लागणार आहेत. तर कॅटामरन बोटसाठी प्रति प्रवाशाला 250 रुपये द्यावे लागतील. महिन्याभराच्या पाससाठी 12,100 रुपये मोजावे लागणार आहेत.

>वॉटर टॅक्सी सुविधेसाठी तिकिट बुकिंग कसे कराल? 

-या लिंकवर क्लिक करा आणि आता वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून ज्या मार्गाने जायचे आहे ते निवडा

-वॉटर टॅक्सीमधील तुम्हाला कोणती सीट हवीय आणि प्रवाशाची अधिक माहिती द्या

-या सुविधेच्या पेमेंटसाठी तुम्ही क्रेटिड, डेबिट किंवा नेटबॅंकिगचा वापर करु शकता

दरम्यान, प्रवासाच्या अर्धातास आधी प्रवाशांना वॉटर टॅक्सीच्या ठिकाणी आपल्या आयडी प्रुफसोबत पोहचावे लागणार आहे. तर  प्रवास करताना फक्त 10 किलो वजनाचे सामान आपल्यासोबत घेऊन जाता येणार आहे. मुख्य म्हणजे ज्या दिवसाचे तिकिट काढले ते त्याच दिवशी वापरावे. तसेच तुमचे तिकिट कोणालाही हस्तांतरण करता येणार नाही आहे.