राज्यात जुलै महिन्यात पाऊस झाल्यानंतर संपुर्ण ऑगस्ट हा कोरडा गेला. त्यामुळे धरणक्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. राज्यातील बहुतांश धरणे पाण्याअभावी रिकामीच आहे. मात्र, प्रमुख शहरांमधील धरणे भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांतील पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठा समाधानकारक आहे. या सातही धरणातील पाणीसाठी 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करण्याऱ्या भातसा तलावातील पाणीसाठा देखील 87 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती आहे. तर अप्पर वैतरणा तलावात मात्र सर्वांत कमी पाणीसाठा जमा झाला झाले. या तलावात 77 टक्के इतकाच पाणीसाठा आहे. (हेही वाचा - Dangerous Bridges in Mumbai: गणेशोत्सवामध्ये मूर्तींचे आगमन आणि विसर्जनाच्या वेळी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन; BMC ने जारी केली मुंबईतील धोकादायक पुलांची यादी (See List))
मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी हे चार तलाव सध्या भरले आहेत. तर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा तलाव अद्यापही भरणे बाकी आहे. हे तलाव भरण्यासाठी किमान दीड लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे सर्व सातही तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी जवळपास 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. गेल्या 15 वर्षांत दोन वेळा तलाव ९० टक्केच भरल्याने वर्षभर 10 टक्के पाणीकपात करावी लागली होती.