Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

तानसा पूर्व आणि पश्चिम मुख्य पाणीपुरवठा (Water supply) लाइनच्या दुरुस्तीच्या कामामुळे वरळी आणि दादरमध्ये 14 मार्च ते 15 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत 18 तास पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. बीएमसीच्या (BMC) हायड्रोलिक अभियांत्रिकी विभागाने (Department of Hydraulic Engineering) दिलेल्या माहितीनुसार, वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ, गोखले मार्ग, वीर सावरकर मार्ग, माहीम, माटुंगा पश्चिम आणि सेनाभवन या भागात 100 टक्के पाणीकपात (Water loss) होणार आहे, तर धोबीघाटात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. हेही वाचा Assembly Elections: लोक आधी भ्रष्टाचार करतात त्यावर केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई होते, मग ते थांबवण्यासाठी दबाव आणतात, पंतप्रधानांनी निकालानंतर साधला मविआवर निशाणा

लोअर परळमधील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकाजवळ 1,450-मिमी व्यासाच्या तानसा पूर्व आणि पश्चिम मुख्य पाणीपुरवठा लाइनमधील गळती दुरुस्तीचे काम केले जाईल. या काळात रहिवाशांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.