Water Cut in Mumbai: मुंबईत 31 मे ते 1 जून या काळात पाणीकपात, पुरेसा पाणीसाठा करण्याचे महापालिकेकडून नागरिकांना अवाहन
Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

मुंबईतील अनेक भागांमधील नागरिकांना 31 मे (मंगळवार) ते 1 जून (बुधवार) या कालावधीत पाणीकपातीचा (Water Cut in Mumbai) सामना करावा लागेल, असे मुंबई महापालिकेने (BMC) म्हटले आहे.(BMC) म्हटले आहे. याबाबत मुंबई महापालिकेने एक निवेदन जारी केले आहे. सलग दोन दिवस पाणी कपात असल्याने आणि त्यानतर पुढचा काही काळ कमी दाबाने पाणिपुरवठा सुरु राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

बीएमसीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या जलवाहीनिचे 1800 मिमी व्यासाचे काम सुरू आहे. लोखंडवाला टाऊनशिप, कांदिवली (पूर्व) येथे W.M x 1500 mm व्यासाचे W.M क्रॉस-कनेक्शन आणि 1800 mm व्यासाचे स्थलांतर/ वळवण्याचे काम कांदिवली (पूर्व) मध्ये हाती घेतले जाईल. त्यामुळे नियमीत पाणीपुरवठ्यावर मोठा ताण येणार आहे. परिणामी दोन दिवस पाणीपुरवाठा बंद ठेवला जाणार आहे. (हेही वाचा, Marathi Signboards on Stores: मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर मुंबई महापालिका करणार कारवाई)

वरील कामांमुळे, आर/दक्षिण प्रभागाच्या कांदिवली (पूर्व), आर/मध्य प्रभागाच्या बोरीवली (पूर्व) परिसरात, आर/उत्तर प्रभागाच्या दहिसर (पूर्व) परिसरात आणि पी/उत्तर प्रभागाच्या मालाडला (पूर्व) भागात पाणीपुरवठा होणार नाही. हे काम 31 मे रोजी सकाळी 8.30 वाजता सुरू केले जाईल आणि जून रोजी सकाळी 8.30 वाजता पूर्ण होईल,” असे महापालिकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.