![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/06/CSMT-OLD-5-380x214.jpg)
अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या दोघांनाही अटक झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. घोषणेनंतर राणा दाम्पत्याला शनिवारी अटक करण्यात आली. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. या सगळ्या गदारोळात आता महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात अपशब्द उच्चारले आहेत.
एकीकडे राणा दाम्पत्याने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली, दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथील आरोग्य शिबिरात बोलताना राणा दाम्पत्याबद्दल अयोग्य भाषा वापरली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘नवनीत राणा आणि रवी राणा यांनी देशात अशांततेचे वातावरण निर्माण केले आहे. ते जाणीवपूर्वक मुंबईत अशांतता निर्माण करत आहेत, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामागे दोघांचा हेतू काय आहे, हे माहीत नाही.’
Those who want CM Uddhav to chant Hanuman Chalisa are "neech and harami".
- Congress Minister Vijay Wadettiwar
— Wali ವಾಲಿ (@Netaji_bond_) April 25, 2022
ते पुढे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा वाचावी, असे नवनीत राणा सांगतात, त्यांनी वाचले नाही तर आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा शिकवू, असेही त्या म्हणाल्या. हे सर्व बोलायला तुमच्या बापाचे काय जाते? तुम्हाला जे बोलायचे आहे ते बोला, जिथे वाचायचे आहे तिथे जाऊन वाचा. मात्र उद्धव ठाकरेंनी बोलायला हवे असे त्या म्हणतात. ते तुमच्या बापाचा नोकर आहेत का? असे नालायक, नीच, हरामी या देशात आहेत, जे आपापसात भांडण लावण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करत आहेत. प्रत्येक घरात हनुमान चालीसा असते, लोक ती वाचतात.’ (हेही वाचा: Loudspeaker Row: 'केंद्राशी चर्चा करून घेतला जाणारा लाऊडस्पीकर बाबतचा निर्णय'- Aaditya Thackeray)
कुणाच्या घरावर जाऊन आंदोलन करणे याला आमचा विरोधचं..पण हनुमान चालिसाचे पठण करणे हा हिंदूस्थानात देशद्रोह कसा काय होऊ शकतो
तसेच महिलांबद्दल अशी गलिच्छ भाषा वापरण्याऱ्या मंत्र्यांचा मी निषेध करते अशांचं जोपर्यंत महिला खेटरं पुजन करणार नाही तोपर्यंत यांचा मेंदू ठिकाण्यावर येणार नाही pic.twitter.com/WgiJ74MYKc
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 25, 2022
दरम्यान, वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हणाल्या की, ‘कुणाच्या घरावर जाऊन आंदोलन करणे याला आमचा विरोधचं..पण हनुमान चालिसाचे पठण करणे हा हिंदूस्थानात देशद्रोह कसा काय होऊ शकतो. तसेच महिलांबद्दल अशी गलिच्छ भाषा वापरण्याऱ्या मंत्र्यांचा मी निषेध करते अशांचं जोपर्यंत महिला खेटरं पूजन करणार नाही तोपर्यंत यांचा मेंदू ठिकाण्यावर येणार नाही.’