हिंगणघाट जळीतकांड पीडितेच्या कुटुंबातील एकाला मिळणार सरकारी नोकरी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चेनंतर मृतदेह स्वीकारण्याचा नातेवाईकांचा निर्णय
Hinganghat Victim Death Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि देशमुख यांनी अश्वस्त केल्यानंतर हिंगणघाट (Hingangha) पीडितेचा मृतदेह स्वीकारण्यास तिच्या कुटुंबीयांनी होकार दिला आहे. मृत्यू झालेली पीडिता ही कुटुंबातील कमावणारी एकमेकव  व्यक्ती होती. कुटुंबाची आर्थिक स्थिती ही प्रचंड नाजूक आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्याचे अश्वाससन गृहमंत्री (Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिल्याचे समजते. गृहमंत्री देशमुख यांनी आश्वस्त केल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पीडितेचा मृतदेह स्वीकारण्यास होकार दिला. त्यानुसार कुटुंबीयांकडून हा मृतदेह ताब्यात घेण्याच्या हालाचालीही सुरु झाल्या आहेत. हॉस्पीटलच्या आवारातूनच पीडितेचे कुटुंबीय आणि गृहमंत्र्यांची दुरध्वनीवरुन चर्चा झाल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

'आमच्यावर जे संकट कोसळले आहे, ते शब्दात सांगता येण्यासारखे नाही. आम्हाला काही नको फक्त आरोपीला आमच्या ताब्यात द्या. किंवा आमच्या मुलीला जशा त्याने वेदना दिल्या तशाच वेदना त्यालाही द्या. त्याला आमच्या मुलीसारखेच जाळून मारा, अन्यथा आम्ही पीडितेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही', असे पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटले होते. त्यामळे पीडित कुटुंबीयांची थेट गृहमंत्र्याशी संवाद घडवून आणण्यात आला. या वेळी वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही उपस्थीत होते. (हेही वाचा, वर्धा: हिंगणघाट पीडितेचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार; 'आरोपीला जिवंत जाळा किंवा आमच्या स्वाधीन करा' नातेवाईकांची मागणी.)

पीडितेच्या वडीलांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री देशमुख यांनी त्यांच्याशी चर्चा केली. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि न्यायालयीन लढा लढण्यासाठी वकील उज्ज्वल निकम यांची निवड केली आहे. अॅड. निकम हे उद्याच नागपूरला येणार आहेत. तसेच, कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा विचार करुन कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत घेण्याचा शब्द गृहमंत्री देशमुख यांनी दिला आहे. देशमुख यांच्या शब्दानुसारच आम्ही मुलीचा मृतदेह ताब्यात घेत आहोत, असेही पीडितेच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.