Image For Representation Building Collapsed (Photo Credits-Twitter)

दिवाळीची धामधुम सुरु असताना परभणीतील सोनपेठेवर मात्र शोककळा पसरली आहे. सोनपेठेत पाडव्याची पहाट सुरु असतान सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळून बाप-लेकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे ऐन दिवाळीत संपुर्ण सोनपेठेवर (Sonpeth) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, अरुण टेकाळे (45) आणि मंदार टेकाळे (8) अशी मृत पावलेल्या बाप-लेकांची नावे आहेत. तर या दुर्घटनेत कस्तुरबा टेकाळे (40) या जखमी झाल्या आहेत.

टेकाळे कुटुंब सोनपेठमधील देवी मंदिर पसिरात गावरस्कर यांच्या जु्न्या वाड्यात भाड्याने राहात होते. पाडवा सुरू होत असतानाच पहाटे साडेचार वाजता घराची भिंत कोसळली. भिंत कोसळत असताना टेकाडे बाप-लेकाच्या अंगावर अचानक फरशीचा स्लॅब कोसळला. यात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. Maharashtra Monsoon Forecast 28th October: महाराष्ट्रात 'क्यार' चक्रीवादळाचा प्रभाव झाला कमी, मुंबईसह विदर्भात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

पहाटे भिंत पडल्याचा मोठा आवाज झाला. यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी वाड्याकडे धाव घेतली. मात्र त्याआधीच बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र, कस्तुरबा टेकाडे सतत आवाज देत होत्या. त्यांचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि कस्तुरबा यांना बाहेर काढले.

अरुण आणि मंदार हे दबले गेल्याने त्यांना मात्र बाहेर काढता आले नाही. थोड्या वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तेथील जमावातील काही तरुणांच्या मदतीने पोलिसांच्या समक्ष दोघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.

याआधी मागे अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवला यांनी भेट देत मृत व्यक्तीच्या परिवाराला 5 लाखांच्या मदतीची घोषणा केली होती.