
अरबी समुद्रात गेल्या 8 दिवसांपासून कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभर 'क्यार' (Kyarr) चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला होता. मात्र आता सद्य स्थितीनुसार हा धोका कमी झाला असून मुंबईसह महाराष्ट्रभर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असेल असा अंदाज स्कायमेट ने वर्तविला आहे. तसेच पावसाळी गतीविधी कमी झाल्या असून आता 1,2 ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
स्कायमेट च्या अंदाजानुसार, देशाच्या मध्य भागांवर अति तीव्रतेचे क्यार चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकले आहे. म्हणून महाराष्ट्र किनारपट्टीवरील त्याचा प्रभाव कमी झाला असून 1-2 सरींसह मध्यम स्वरुपाचा पाऊस दिसून येईल. Kyarr Cyclone चा मुंबई वरील धोका टळला; 7 नोव्हेंबर पर्यंत पावसाची रिपरिप कायम राहणार: हवामान वेधशाळेचा अंदाज
स्कायमेट चे ट्विट:
हवामान अंदाज 28 ऑक्टोबर: मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि गोवा येथे विखुरलेला पाऊस अपेक्षित#maharastra#MumbaiRain#Pune#CycloneKyarrhttps://t.co/1TlcP5ryYD
— Skymet Marathi (@SkymetMarathi) October 27, 2019
मराठवाडा, कोकण आणि गोव्यामध्ये मध्यम ते विखुरलेला पाऊस पाहायला मिळू शकते, असे ही स्कायमेटकडून सांगण्यात येत आहे. तसेच पुणे आणि मुंबईत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून नागपूरात कोरडे हवामान दिसू शकते असेही स्कायमेटने सांगितले आहे.
तर मुंबईत पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोर धरला होता तो आता ओसरला आहे. रविवारी दिवसभर कडाक्याचे उन दिसून आले. आजही ढगाळ वातावरण आहे पण पावसाची शक्यता वाटत नाही. मात्र विदर्भासह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.