Vitthal Rukmini (Photo Credit: Twitter/@PandharpurVR)

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2023) निमित्त चंद्रभागेच्या वाळवंटी जावे आणि स्नान करुन सावळ्या विठुरायाचे दर्शन घ्यावे. पाठिमागच्या शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा. पण काळ बदलला. काळानुरुप वय वाढते, कामाचा व्याप वाढतो, लोक व्यग्र होतात. सहाजिकच विठेवर उभ्या असलेल्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी जाणे होतेच असे नाही. अशा वेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयोगी येते आणि पंढरपूरच्या (Pandharpur) पांडूरंगाचे थेट दर्शन घडते. होय, आपणासही पंढरपूरच्या पांडूरंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर आपण ते लाईव्ह घेऊ शकता. त्यासाठी आपणास खाली व्हिडिओवर जावे लागेल.

विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारत आणि जगभरातून लोक पंढरपूर येथे दाखल होता. आषाढी एकादशी निमित्त पांडूरंगाचे दर्शन मिळावे यासाठी शेकडो वारकरी प्रतिक्षेत असतात. संत ज्ञानेश्वर, तुकारामाच्या पालख्या आणि दिंड्या, पताका घेऊन हे वारकरी पंढरपूर येथे दाखल होतात. इथे कोणी उच्च, निच असत नाही. सर्वजण समान असतात. पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाच्या चरणी लीन होतात आणि भंगवंताचे मनोभावे दर्शन घेऊन तृप्त होतात. (हेही वाचा, Pandharpur Ashadhi Ekadashi Shaskiya Mahapuja 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा, बळीराजासाठी पांडूरंगाला साकडे)

व्हिडिओ

दरम्यान, आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा देखीलकेली जाते. त्यात्या वर्षी असलेले विद्यमान मुख्यमत्री ही पूजा सपत्नीक करतात. यंदा ही पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पहाटे तीन वाजता पार पडलेल्या या पूजेवेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी पांडूरंगाकडे साकडे घातले. बळीराजा सुखी व्हावा. या राज्याला चांगले सुखासमाधानाचे दिवस यावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी पांडूरंगाकडे केल्याचे सांगितले.

दरम्यान, या वेळी काळे दाम्पत्याला विठ्ठल रखुमाईच्या महापूजेचा मान मळाला. भाऊसाहेब काळे (वय 56 वर्षे) आणि पत्नी मगंल काळे (वय 52) वर्षे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. पाठिमागील 25 वर्षांहून अधिक काळ आम्ही विठ्ठलाची वारी करतो आहोत. यंदा आम्ही गाडीने वारीला आलो आहोत. आम्ही 8 तास रांगेत दर्शनासाठी उभे आहोत, असे सांगतानाच देवगड संस्थानच्या भास्करजी महाराजांच्या प्रेरणेनं आम्हाला आज आह मान मिळाला. ही पांडुरंगाचीच कृपा आहे, असेही काळे दाम्पत्याने म्हटले.