बुलेट ट्रेनपेक्षा ही अधिक वेगवान Hyperloop, मुंबई-पुणे अंतर 35 मिनिटांत पार करणे होणार शक्य
Virgin Hyperloop One (Photo Credits-Twitter)

मुंबईत लवकरच बुलेटट्रेन पेक्षा अधिक वेगवान असणाऱ्या हायपरलूप (Hyperloop) यंत्रणेच्या माध्यमातून मुंबई-पुणे (Mumbai-Pune) अंतर 35 मिनिटात पार करता येणार आहे. यासाठी भारतात सध्या हायपरलूप प्रोजेक्टवर काम सुरु करण्यात आले आहे. या नव्या यंत्रणेच्या सहाय्याने अवघ्या काही वेळातच प्रवासाचा लांब पल्ला गाठता येणार आहे. हायपरलूपमध्ये ट्युब सिरीज आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता अधिक वेगवान असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी एक विशिष्ठ पद्धतीचे आसन असते.

अद्याप हायपरलूपच्या माध्यमातून कोणतेही काम पूर्ण करण्यात आलेले नाही. रिपोर्टच्या नुसार या यंत्रणेसाठी काही अडथळे येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने याची चाचणी केली जात आहे. महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात या यंत्रणेचे डील होणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई-पुण्यासाठी हायपरलूप प्रोजेक्टसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. मुंबई ते पुणे अंतर 200 किमी असून या यंत्रणेद्वारे ते अवघ्या 35 मिनिटांत कापणे शक्य होणार आहे.(मुंबईकरांसाठी खूषखबर! लवकरच 'मुंबई लोकल'चा वेग वाढणार; सप्टेंबर 2019 पासून धावणार सेमी एसी लोकल)

या वर्षाच्या अखेरपर्यंत Virgin Hyperloop One कंपनीला याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे. या प्रोजेक्टअंतर्गत Phase 1 साठी 1.18 किमी अंतरासाठी 2020 मध्ये काम सुरु करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यापूर्वी मुंबई-पुणे अंतर कापण्यासाठी 3.5 तास लागत होते. मात्र आता हायपलूप यंत्रणेच्या सहाय्याने ते फक्त 35 मिनिटांचे होणार आहे.