मुंबईकरांसाठी खूषखबर! लवकरच 'मुंबई लोकल'चा वेग वाढणार; सप्टेंबर 2019 पासून धावणार सेमी एसी लोकल
मुंबई लोकल | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईची लाईफलाईन आहे. घडाळ्याच्या काट्यावर चालणारे अनेक मुंबईकर तिच्या वेळापत्रकानुसार आपलं दिवसभराचं शेड्युल आखतात. मुंबईत वेगवान आणि स्वस्त सार्वजनिक वाहतूक म्हणून अनेकजण रेल्वेची निवड करतात. आता लवकरच मुंबईकरांच्या या लाईफलाईनचा वेग वाढणार आहे. नुकत्याच रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेचा वेग वाढणार आहे. त्यामुळे काही रेल्वेसेवा देखील वाढणार आहेत. उशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला

लवकरच मुंबई लोकलचा वेग 110 kmph होण्याची शक्यता आहे असे सांगितले जात आहे. सध्या मुंबई लोकल 80-100 kmph या वेगाने धावत आहे. यामुळे मुंबई लोकलच्या फेर्‍यादेखील वाढू शकतात. सध्या मुंबईत मध्य रेल्वेच्या 1774 आणि पश्चिम रेल्वेच्या 1367 लोकल सेवा धावत आहेत. मुंबई: गर्भवती महिलांना आता लोकलमधील दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करता येणाार, रेल्वे प्रशासनाची परवानगी

भारतीय रेल्वे लवकरच मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, भुसावळ-नाशिक यादरम्यान  MEMU services चालवणार आहे. यामुळे 2 तासात प्रवास करणं शक्य होणार आहे. मुंबईमध्ये पहिली सेमी एसी लोकल सप्टेंबर 2019 मध्ये सुरू होणार आहे. यामध्ये सहा एसी आणि सहा नॉन एसी डब्बे असतील.